मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (16:12 IST)

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुन्हा पाऊस

Low pressure area in the Bay of Bengal
राज्यात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने मागील काही दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. यात पुढील दोन-तीन दिवसात हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र,आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे येत्या ३ ते ४ दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये एखाद दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने दिली आहे. खास करून मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. अशी माहिती के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.

यात नाशिक, पुणे,सातारा,औरंगाबाद,यवतमाळ,कोल्हापूर,जालन्यात पुढील तीन दिवसांत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.राज्याच्या किनार पट्टीच्या भागात ढगांची दाटी दिसत पावसासाठी चांगले चिन्ह दिसत आहे. गेल्या २४ तासात राज्यात, खास करून मराठवाडा व बाजूच्या परिसरात माध्यम ते मुसळधार पावसाच्या नोंदी IMD कडे आली आहे.