1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Madhukar Maharaj Barulkar Passes Away in an Accident

हभप मधुकर महाराज बारूळकर यांचे अपघाती निधन

नांदेड मध्ये बहुजन चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि पुरोगामी विचारवंत हभप मधुकर महाराज बारुळकर यांचे अपघाती निधन झाले आहे. 
सदर घटना काल दुपारी घडली. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवव्याख्याते हभप महाराज बारुळकर यांचे दुचाकी आणि टिप्परची धडक होऊन भीषण अपघात घडला आणि या अपघातात त्यांचे दुर्देवी निधन झाले.
वृत्तानुसार, नांदेड येथे शिव कुटुंब मेळावा आयोजित करण्यात आला असून हा मेळावा झाल्यानंतर बारुळकर महाराज आपल्या दुचाकीने स्वगावी बारुळकडे निघाले असताना ढवळे कॉर्नर येथे पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्याच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या जोरदार धडकेत महाराजांचा जागीच मृत्यू झाला. 
त्यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक आणि प्रबोधन क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Edited By - Priya Dixit 

पुढील लेख
LIVE: लाडकी बहीण योजना: eKYC ची अंतिम मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवली