मंगळवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील कसारा स्थानकावर आलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यावर भूस्खलनाचा ढिगारा कोसळल्याने एक पुरुष प्रवासी जखमी झाला. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी पीटीआयला सांगितले की, रात्री9.15 वाजता मुंबई सीएसएमटीपासून सुमारे 120 किमी अंतरावर असलेल्या कसारा स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर लोकल ट्रेन प्रवेश करत असताना ही घटना घडली.