सोमवार, 24 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 24 फेब्रुवारी 2025 (12:51 IST)

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणार

Maharashtra Marathi Breaking News Live Today :हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. या मागणीसह महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ फ्रान्समधील पॅरिस येथे पोहोचले आहे.राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.... 

12:51 PM, 24th Feb
नीलम गोऱ्हेचे वक्तव्य विकृती म्हणत संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मोठे विधान दिले. त्या म्हणाल्या, ठाकरे पक्षात पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागतात. या वरून राजकारण चांगलंच तापलं आहे..सविस्तर वाचा...

11:52 AM, 24th Feb
गडचिरोलीत बाबासाहेबांचा अपमान केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह 2 जणांना अटक
गडचिरोलीच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सोमनपल्ली गावातील एका प्रवासी शेडच्या भिंतीवर एका विकृत व्यक्तीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द लिहिले.सविस्तर वाचा...

11:49 AM, 24th Feb
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणार, महाराष्ट्र सरकारचा उपक्रम
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला आहे. या मागणीसह महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ फ्रान्समधील पॅरिस येथे पोहोचले आहे.सविस्तर वाचा...

10:57 AM, 24th Feb
वडाळा येथे भरधाव कारने धडक दिल्याने 18 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू, आई जखमी
मुंबईच्या वडाळा येथे फुटपाथवर झोपलेल्या आईसह 18 महिन्यांच्या बाळाला कार ने धडक दिली. त्यात बाळाचा जागीच मृत्यू झाला तर आई जखमी झाली आहे.सविस्तर वाचा...
 

10:46 AM, 24th Feb
नीलम गोऱ्हे यांचा विधानावर अंबादास दानवे यांचे उत्तर तुमच्या कमाईचा तपशील द्या
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दावा केला की शिवसेनेत (UBT) पदे पैशाने मिळवली जातात, ज्यामध्ये मर्सिडीज कार भेट म्हणून देणे देखील समाविष्ट आहे. त्या पुढे म्हणाल्या, संजय राऊतांनी मला आमदार बनवण्याचा प्रयत्न केला मी काहीही दिले नाही. पक्षाने माझ्याकडून काहीही मागितले नाही.

08:46 AM, 24th Feb
अमित शाह यांनी दिला उपमुख्यमंत्री शिंदे यांना महायुतीची गाडी नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार  टांगा पलटी करण्याचे अल्टिमेटम देत आहेत. शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शीतयुद्धाची चर्चा जोरात सुरू असताना हे विधान देण्यात येत आहे. दरम्यान, शनिवारी पहाटे 4 वाजता शिंदे यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.सविस्तर वाचा ...