1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (15:45 IST)

महाराष्ट्र क्रांती सेना लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार

आरक्षणासाठी राज्यभर भव्य मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक सुरेश पाटील यांनी नव्या महाराष्ट्र क्रांती सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. आता हा पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. या पक्षाकडून आगामी निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवण्यात येणार आहेत. सोमवारी कोल्हापूरात याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
 
दरम्यान, साताऱ्याचे खासदर उदयनराजे भोसले हे जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार नसतील तर महाराष्ट्र क्रांती सेनेकडून लढवतील अशी अपेक्षा आणि विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.