बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2024 (10:57 IST)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन

raj thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- महाराष्ट्र नवनिर्माण सेनाला आज सतरा वर्ष पूर्ण झाली. आज मनसेचा वर्धापन दिन आहे. या निमित  सायंकाळी सहा वाजता गडकरी रंगायथन ठाणे इथे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार आहे. तसेच सर्वाचं लक्ष लागलं आहे या सभेत राज ठाकरे हे नेमकं काय बोलणार आहेत आणि मनसे कडून नव्या उत्साहात, नव्या दमाने, नव्या आयुधांसह नवनिर्माण सज्ज! हे आशयाचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 
 
मनसेला आज 17 वर्ष पूर्ण होत आहेत. 9 मार्च 2006 साली मनसे स्थापन झाली होती. राज ठाकरेंची सभा गडकरी रंगायथन येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. तसेच 'साहेब' असे असे फलक लावून मनसेने वातावरणनिर्मिती केली आहे. शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी सभेच्या निमित्ताने मनसेने केली आहे. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरे यांनी राज्यात अनेक दौरे केलेत. व पदाधिकाऱ्यांच्या बैठका देखील घेतल्या. व संघटनेच्या वाटचाली संदर्भात आज राज ठाकरे हे काय बोलतील या कडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. प्रसारमाध्यमांनी राज ठाकरेंना राज्यातील राजकारणासंदर्भात विचारणा केली होती. राज्यातील राजकारणाचा चिखल झाला असल्याचे राज ठाकरे हे म्हणाले होते. व मी गुढीपाडवा मेळाव्यात बोलणार असे त्यांनी सांगितले होते. ट्रेलर, टीझर नाही तर पूर्ण सिनेमाच दाखवणार असल्याचे त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते.
तसेच साजऱ्या होण्याऱ्या वर्धापनदिनाचा टीझर देखील रिलीज झाला आहे.  तसेच अधिकृत ट्विटर अकाउंटवरून मनसेच्या हा टीझर प्रसिद्ध केला आहे आणि या मध्ये काही महत्वाची मनसेची आंदोलनाची दृष्ये दाखवली आहे. तसेच राज ठाकरेंच्या भाषणाच्या काही भाग दाखवला आहे. तसेच त्यांनी 'नव्या दमाने, नव्या आयुधांसह... नवनिर्माणास सज्ज' हे ब्रीद वाक्य टाकले आहे.

Edited By- Dhanashri Naik