शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 जानेवारी 2022 (11:52 IST)

Maharashtra Omicron Guidelines: राज्यात आजपासून नवीन निर्बंध लागू, नियम मोडल्यास कठोर कारवाई

राज्यात  कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नवीन निर्बंध लादले आहेत. त्याअंतर्गत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नवीन नियम रविवारी रात्री 12 पासून लागू होणार आहेत. शनिवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकाराची 133 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, येथे आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या 1009 वर पोहोचली आहे.  ओमिक्रॉनची एकूण 1009 प्रकरणे आतापर्यंत आढळून आली आहेत, एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, त्यापैकी 439 रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ओमिक्रॉनच्या 133 नवीन प्रकरणांपैकी 130 भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतून नोंदवले गेले आहेत, तर तीन प्रकरणांच्या संदर्भात, गुजरातमधील प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी 118 प्रकरणे पुणे शहरातील आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये आठ, पुणे ग्रामीणमध्ये तीन, वसई-विरारमध्ये दोन आणि अहमदनगर आणि मुंबईत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत मुंबईत ओमिक्रॉनची सर्वाधिक 566 प्रकरणे आढळून आली आहेत, त्यानंतर पुणे शहरात 201 प्रकरणे आहेत.
 
नवीन निर्बंध: रात्री 11 वाजल्यापासून नाईट कर्फ्यू
नवीन नियमांनुसार, 
* रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत फक्त लोक अत्यावश्यक कामांसाठी घराबाहेर पडू शकतील. 
* 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील, 
*  स्विमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलूनही पूर्णपणे बंद राहतील.  * 
* मनोरंजन पार्क, प्राणीसंग्रहालय, संग्रहालये आणि किल्ले देखील पूर्णपणे बंद राहतील.
* 50 लोक लग्न समारंभ, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतील, 
*  केवळ 20 लोक अंत्यसंस्कारांना उपस्थित राहू शकतील. 
 * खाजगी कार्यालये, हेअर कटिंग सेंटर, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स 50 टक्के क्षमतेने उघडतील आणि ज्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाईल. 
* हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे पूर्णपणे बंद राहतील. 
* मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळे, स्विमिंग पूल, जिम, स्पा, वेलनेस सेंटर्स, ब्युटी सलून, मनोरंजन पार्क, प्राणीसंग्रहालय, संग्रहालये, किल्ले हे पूर्णपणे बंद असतील .
* मॉल्स, थिएटर्स, सिनेमा हॉल, हेअर कटिंग सेंटर, शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट्स, खाजगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने चालतील .
सर्व नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणा आणि पोलिसांना दिले आहेत.