1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 2 जुलै 2023 (15:19 IST)

Maharashtra Politics : अजित पवार महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते शिंदे- फडणवीस सत्तेत सहभागी झाले असून राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शपथ सोहळा झाला. अजित पवार हे तिसऱ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहे. त्यांच्या सह छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, अनिल भाईदास पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडे, हसन मुश्रीफ आणि धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील शपथ घेतली. 
 
सकाळी अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी मंत्र्यांसमवेत बैठक झाली आणि त्यांनतर अजित पवार राजभवनाकडे निघाले. राज्याच्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून राज्याचे नवे उपमुख्यमंत्र्यांची शपथ अजित पवार यांनी घेतली.  
 
काही वेळेपूर्वी शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली होती. त्यात त्यांनी आपल्याला अजित पवारांच्या बैठकीविषयी काहीच माहिती नसल्याचे म्हटले होते.
 
या निर्णयाने मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मोठा धक्का मिळाला आहे.  अजूनही शरद पवार यांची काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही.


Edited by - Priya Dixit