शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (12:01 IST)

Maharashtra Rain:कोकण आणि मराठवाड्यात अतिवृष्टीनंतर पूर परिस्थिती, आयएमडीने 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला

महाराष्ट्रातील मराठवाडा भागांमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस सुरु आहे. येथे 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस नोंदविण्यात आला आहे. या पावसामुळे सिंचन प्रकल्पांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. हवामान खात्यानुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बुधवारी महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यासह, येत्या 3 दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे.
 
हवामान खात्याने मुंबई, ठाणे,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नाशिक, पुणे,सातारा आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवत ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. त्याचबरोबर विभागाकडून शनिवारपर्यंत दक्षिण कोकण विभागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे.तसेच पालघरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले आहे.
 
नांदेडमध्ये मुसळधार पावसामुळे शहर आणि गावांचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील भोकर, हदगाव, हिमायतनगर, मुखेड आणि अर्धपुरी येथील रस्ते रात्रभर पावसानंतर पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यावर इतके पाणी भरले होते की, सकाळचे वर्तमानपत्र आणि दूध सुद्धा लोकांच्या घरापर्यंत पोहोचू शकले नाही. असा अंदाज वर्तवला जात आहे की पाऊस असाच चालू राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
 
गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात पावसाचे जोर तीव्र झाले आहेत. याचा जास्तीत जास्त परिणाम कोकण आणि मराठवाडा उपविभागात दिसून येत आहे, जेथे गेल्या 2, 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारपर्यंत 36 पैकी फक्त तीन जिल्ह्यांत पावसाची नोंद कमी झाली आहे. ज्यामध्ये नंदुरबारमध्ये -43 टक्के, गोंदियात -26 टक्के आणि गडचिरोलीमध्ये -24 टक्के पावसाची नोंद झाली आहे.