1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 सप्टेंबर 2021 (08:19 IST)

दुर्देवी ! विजेचा शॉक लागून 2 चुलत भावंडांचा मृत्यू

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे.लिंगेवाडी येथे शेतात विजेचा शॉक लागून 2 चुलत भावाचा मृत्यू  झाला आहे.सचिन रामकीसन घोडे  (वय, 23) आणि पवन गजानन घोडे (वय, 23) अशी मृत भावाची नावे आहेत.

याबाबत अधिक माहीती अशी की, भोकरदन शहरासह परिसरात सकाळ पासून संततधार पाऊस सुरू होता. शेतात बैलासाठी कडबा कुट्टी मशीन सुरू करण्यासाठी पवन आणि सचिन गेले, दाेघांनाही मशीन व वायर मध्ये उतरलेल्या विजेचा शॉक बसला.ही दुर्घटना घोडे वस्तीवर राहणाऱ्या रामकीसन घोडे यांच्या शेतातील घरासमोर घडली.
 
यानंतर त्यांना तातडीने भोकरदन ग्रामीण रुग्णालयात  नेण्‍यात आले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यु झाला. असं डॉ. श्रीमती मेहत्रे यांनी सांगितलं. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.दरम्यान, दोन्ही तरुण हे भोकरदन शहरात गॅरेजमध्ये मॅकॅनिक म्हणून काम करत होते.त्याचबरोबर ते महाविद्यालयीन शिक्षण देखील घेत होते.