सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 सप्टेंबर 2021 (23:05 IST)

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात जोरदार पावसाची शक्यता

राज्यात येत्या दोन ते तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवड्यात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. महत्वाचं म्हणजे रत्नागिरी आणि रायगडला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. यामुळे याठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे चिपळूणमध्ये  एनडीआरएफचं पथक दाखल झालं आहे.
 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने याचा थेट आणि संपूर्ण परिणाम हा महाराष्ट्रावर होणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील २ ते ३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.