रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 13 जुलै 2021 (16:00 IST)

Maharashtra SSC Board Exam Result 2021 दहावीचा निकाल आठवड्याभरात

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकालया आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा निकाल एमएसबीएसएचएसई (MSBSHSE) चे अधिकृत संकेतस्थळ- mahresult.nic.in. वर जाहीर होईल. कोरोना व्हायरस महामारीमुळे यंदा मूल्यंकनाची पद्धतच बदलली आहे. त्यामुळे यंदा निकाल कसा लागतो याबाबत उत्सुकता आहे.
 
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल 15 जुलै पर्यंत जाहीर केला जाणे अपेक्षीत आहे.दरम्यान, परीक्षेचा निकाल या आठवड्यात जाहीर केला जाईल असा तर्क असला तरी एमएसबीएसएचएसई आतापर्यंत तरी नेमकी तारीख जाहीर केली नाही. मात्र, लवकरच हा निकाल जाहीर केला जाईल अशी शक्यता मात्र बोर्डाकडून व्यक्त केली जात आहे. जगभरात आलेल्या कोरोना व्हायरस महामारीचा फटका देशासोबतच महाराष्ट्रालाही बसला आहे. त्यामुळे यंदा SSC Board Exam 2021 रद्द करण्यात आल्या. परीक्षा रद्द झाल्यानंतर नेहमीप्रमाणे बोर्ड परीक्षा घेतल्या जाणार नसल्यने गुणदान कसे करायचे हा प्रश्नच होता. परंतू, अंतर्गत मूल्यमापणाचा तोडगा काढत शिक्षण विभागाने गुणदान पद्धती ठरवून दिली. त्यानुसार निकाल जाहीर केला जाणार आहे.