2019 मध्ये नोकरदरांसाठी खूशखबर आहे की या वर्षात 21 रजा येणार असून मात्र तीन सुट्टयांचे नुकसान झेलावं लागणार आहे. तसेच रविवारसह एकूण 73 सुट्ट्यांची पर्वणी मिळणार आहे. 2019 च्या दिनदर्शिकेनुसार या वर्षी सुट्ट्यांचे दिवस अधिक असल्याचे दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लक्ष्मीपूजन आणि ईद-ए-मिलाद केवळ या तीन सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. परंतू विशेष म्हणजे याला जोडून येत असलेल्या सुट्ट्या किंवा सुट्ट्यांचे नियोजन करुन हॉलिडे आनंदात साजरा केला जाऊ शकतो. तर बघू या या वर्षीच्या सुट्ट्या:
26 जानेवारी, शनिवार- प्रजासत्ताक दिन
19 फेब्रुवारी, मंगळवार- शिवाजी महाराज जयंती
4 मार्च, सोमवार- महाशिवरात्री
21 मार्च, गुरुवार- होळी धूलिवंदन
6 एप्रिल, शनिवार- गुढीपाडवा
13 एप्रिल, शनिवार- श्रीरामनवमी
14 एप्रिल, रविवार- डॉ. आंबेडकर जयंती
17 एप्रिल, बुधवार- श्रीमहावीर जयंती
19 एप्रिल, शुक्रवार- गुड फ्रायडे
1 मे, बुधवार- महाराष्ट्र दिन
18 मे, शनिवार- बुद्ध पौर्णिमा
5 जून, बुधवार- रमजान ईद
12 ऑगस्ट, सोमवार- बकरी ईद
15 ऑगस्ट, गुरुवार- स्वातंत्र्यदिन
17 ऑगस्ट, शनिवार- पारसी न्यू इयर (पतेती)
2 सप्टेंबर, सोमवार- श्रीगणेश चतुर्थी
10 सप्टेंबर, मंगळवार- मोहरम
2 ऑक्टोबर, बुधवार- महात्मा गांधी जयंती
8 ऑक्टोबर, मंगळवार- दसरा
27 ऑक्टोबर, रविवार- दिवाळी लक्ष्मीपूजन
28 ऑक्टोबर, सोमवार- दिवाळी बलिप्रतिपदा
10 नोव्हेंबर, रविवार- ईद-ए-मिलाद
12 नोव्हेंबर, मंगळवार, गुरू नानक जयंती
25 डिसेंबर, बुधवार- नाताळ