1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 मार्च 2025 (12:24 IST)

महाराष्ट्र परिवहन विभागाने जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा HSRP बसविण्याची अंतिम मुदत वाढवली

Vehicle
महाराष्ट्र परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर  उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक HRSP बसविण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत केली आहे. या मुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. 
परिवहन आयुक्ताने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यातील सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रात जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक वाहन वितरक, ऑटोरिक्षा, टॅक्सी, बस ट्रक संघटनांच्या बैठका घेऊन वाहनचालकांना या बाबतीत देण्याच्या सूचना दिल्या आहे. 
या पूर्वी वाहनांसाठी HSRP बसविण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 होती. वाहनधारकांचा प्रतिसाद कमी आल्यामुळे मुदतवाढ  30 जून 2025 पर्यंत केली आहे.अंतिम मुदत संपण्यापूर्वी वाहनधारकांनी HRPS बसवण्याची विनंती परिवहन अधिकाऱ्यांकडून नागरिकांना करण्यात आली आहे. तसेच नियमांचे पालन न केल्यावर वाहनधारकांच्या विरुद्ध कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit