शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 जून 2021 (13:12 IST)

महाराष्ट्र आजपासून अनलॉक, कोणते निर्बंध शिथिल जाणून घ्या

दोन महिन्यानंतर आजपासून महाराष्ट्र अनलॉक होतं आहे. दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारनं अनलॉकबाबत आदेश जारी केली. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथील करण्यात येत आहे. यासाठी पाच स्तर निश्चित केले गेले आहेत. तर चला जाणून घेऊया तुमच्या जिल्ह्यात कोणते निर्बंध शिथिल झाले आहेत ते *
 
मुंबई
* जीवनाश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत, इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 2 वाजेपर्यंत, अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद
* हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत. दुपारी 2 नंतर पार्सल सेवा. शनिवार आणि रविवार बंद
* सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरु
* खाजगी आणि सरकारी कार्यालयात 50 टक्के क्षमतेने उपस्थिती
* चित्रपट शूटिंगला स्टुडिओमध्ये परवानगी
* सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजन कार्यक्रमाला 50 टक्के क्षमतेने दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी. शनिवार आणि रविवार बंद
* लग्न सोहळे 50 जणांची उपस्थिती
* अंत्यसंस्कारासाठी 20 जणांची उपस्थिती
* इतर बैठका 50 टक्के उपस्थिती
* कृषी क्षेत्रातील कामांना आणि ई कॉमर्स, बांधकाम क्षेत्रातील कामांना दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी
* दुपारी 2 वाजल्यानंतर जमावबंदी कायम
* मॉल्स आणि सिनेमागृह पूर्णपणे बंद राहतील
* इनडोअर स्पोर्ट्स बंद राहतील
 
नागपूर
* जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानं दररोज 5 वाजेपर्यंत सुरू
* इतर दुकाने संध्याकाळी 5 वाजे पर्यंत सुरू
* रेस्टारंट, बार 50 टक्के आसनक्षमतेने ने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू
*वॉकिंग सकाळी 5 ते 9, संध्याकाळी 5 ते 9 परवानगी
* सरकारी व खाजगी ऑफिस 100 टक्के उपस्थितीने संध्याकाळी 5 वाजेपर्यंत  
* मॉल्स, थिएटर, मल्टिप्लेक्स संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच सुरू
* खेळाचे मैदान, क्रीडांगण, उद्यान सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत, संध्याकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत
* लग्न समारंभासाठी 100 लोकांपर्यंत मर्यादा किंवा मंगल कार्यालयाची, हॉल च्या 50 टक्के क्षमता
* अंत्यसंस्कारासाठी 50 लोकांपर्यंत
* जिम, सलून, पार्लर संध्याकाळी 5 वाजेपर्यत..
 
नाशिक 
* दुकानं आणि आस्थापनांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत
* बांधकाम आणि उद्योग क्षेत्र दिवसभर सुरु राहणार
* सलून, जिम 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
* दुपारी 4 ते सकाळी 7 पर्यंत जिल्ह्यात संचारबंदी लागू राहणार
* अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार आणि रविवार बंद
 
कोल्हापूर 
 * दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु
 * उद्यानं पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरु
 * लग्नसोहळ्याला 25 लोकांची उपस्थिती 
 * अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थिती
 * सार्वजनिक कार्यक्रम, सिनेमा थिएटर, मॉल यांना बंदी
 
सातारा
 * जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली
 * इतर दुकानं बंदच राहणार   
 
पालघर
 * जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली
 * इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली
 * हॉटेल, रेस्टॉरंट सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु
 * मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहतील
 
रायगड
 * जीवनावश्यक वस्तूंची दुकांनी सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खुली
 * जिम, स्पा आणि पार्लर दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु
 * उद्याने, जॉगिंग पार्क पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरु
 
सांगली
 * जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु
 * इतर दुकानं पूर्णपणे बंद
 
गडचिरोली
 * जीवनावश्यक वस्तूंची दुकानं आठवडाभर सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु
 * इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु
 * उपाहारगृह, रेस्टॉरंट्सना 50 टक्के क्षमतेने खुली ठेवण्यास परवानगी
 
अकोला
 * सर्वप्रकारची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु
 * सरकारी कार्यालयं, हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु
 * सलून, स्पा, ब्युटी पार्लर 50 टक्के क्षमतेने खुली करण्यास परवानगी
 * लग्नकार्यांना 50 लोकांच्या उपस्थितीची मुभा
 * अंत्यसंस्काराला 20 लोकांना उपस्थित राहता येणार
 * जिल्ह्याअंतर्गत वाहतूक नियमित सुरु राहिल
 * थिएटर्स, मॉल, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहतील
 * शनिवार व रविवार जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील
 
वर्धा
 * जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानं दररोज सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु
 * इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरु
 * कार्यलयीन उपस्थितीला 50 टक्क्यांची परवानगी
 * हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के आसनक्षमतेने सुरु
 
नंदुरबार
 * लग्नसमारंभासाठी 100 जणांना परवानगी
 * सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हॉलच्या 50 टक्के क्षमतेने परवानगी
 * लस घेतल्यांसाठी सलून सुरु 
 * रात्रीची संचारबंदी कायम
 * शनिवार आणि रविवारचा जनता कर्फ्यू बंद
 
 
 
कसं असेल आजपासून राज्यातील अनलॉक
पहिला स्तर  * पॅाझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजन बेड्स 25 टक्क्यांपेक्षा कमी भरलेले असतील.
दुसरा स्तर  * पॅाझिटिव्हिटी दर 5 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांपर्यंत भरलेले असतील.
तिसरा स्तर  * पॅाझिटिव्हिटी दर 5 ते 10 टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.
चौथा स्तर  * पॅाझिटिव्हिटी दर 10 *20 टक्क्यांच्या दरम्यान असेल आणि ऑक्सिजन बेड्स 60 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.
पाचवा स्तर  * पॅाझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असतील आणि ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले असतील.
 
 
काय काय होणार अनलॉक
 
पहिल्या स्तरासाठी हे नियम :
सर्व प्रकारची (अत्यावश्यक सेवेतील आणि अत्यावश्यक सेवेत नसलेली) दुकानं नियमितपणे सुरू राहतील.
मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह इत्यादी नियमतपणे सुरू राहतील
रेस्टॉरंट नियमितपणे उघडतील
लोकल ट्रेन पूर्ववत सुरू होतील. मात्र, स्थानिक DMA याबाबत आवश्यकतेनुसार निर्णय घेईल.
सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग नियमित सुरू होईल
सर्व खासगी कार्यालयं सुरू करता येतील.
सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीस परवानगी. खासगी कार्यलयांमध्ये आवश्यक असल्यास 100 टक्के उपस्थितीस परवानगी.
विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल
लग्नसोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतीही बंधनं नसतील, या भागात जमावबंदी नसेल.
बांधकाम, कृषी, ई *कॉमर्स नियमित सुरू राहतील
आंतरजिल्हा प्रवास नियमित. मात्र, लेव्हल *5 जिल्ह्यातून कुणी येत असेल तर ई *पास बंधनकारक असेल.
जमावबंदी लागू राहणार नाही.
 
दुसऱ्या स्तरासाठी हे नियम :
सर्व प्रकारची (अत्यावश्यक सेवेतील आणि अत्यावश्यक सेवेत नसलेली) दुकानं नियमितपणे सुरू राहतील.
मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह इत्यादी 50 टक्के क्षमतेत सुरू होतील
लोकल ट्रेन वैद्यकीय सेवा, अत्यवश्यक सेवा, महिलांसाठी सुरू राहतील. DMA आवश्यकतेनुसार निर्णय घेतील.
सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग नियमित सुरू होईल
सर्व खासगी कार्यालयं सुरू करता येतील.
सरकारी कार्यालयांमध्ये 100 टक्के उपस्थितीस परवानगी. खासगी कार्यलयांमध्ये आवश्यक असल्यास 100 टक्के उपस्थितीस परवानगी.
विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते रात्री 9 अशी मर्यादा इनडोअर गेम्सना आहे. तर आऊटडोउर गेम्स पूर्ण दिवस बंद राहतील.
चित्रिकरण नियमितपणे सुरू राहील.
सामाजिक, सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.
लग्न समारंभांसाठी हॉलच्या 50 क्षमतेइतकी उपस्थितीची मुभा. मात्र, जास्तीत जास्त 100 लोकांना परवानगी.
अंत्यविधीसाठी उपस्थितीची कुठलीही मर्यादा नाही.
सभा आणि निवडणुकांसाठी 50 टक्क्यांच्या उपस्थितीच मर्यादा असेल.
बांधकाम, कृषी, ई *कॉमर्स हे नियमित सुरू राहतील.
सार्वजनिक वाहनं 100 टक्के क्षमतेने चालतील.
जमावबंदी लागू राहील.
 
तिसऱ्या स्तरासाठी हे नियम :
अत्यावश्यक सेवेतील दुकानं रोज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकानं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत सुरू राहतील.
मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रीन थिएटर, नाट्यगृह बंद राहतील.
रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत 50 टक्क्यांच्या क्षमतेनं उघडीतल. त्यानंतर पार्सल सेवा सुरू राहील.
लोकल ट्रेन केवळ वैद्यकीय, अत्यावश्यक सेवा आणि महिलांसाठी सुरु राहील. DMA आवश्यकेतनुसार निर्णय घेतील.
सार्वजनिक ठिकाणं, उघडी मैदानं, वॉक, सायकलिंग सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत रोज सुरु राहतील.
खासगी कार्यालयं सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 4 पर्यंत सुरू ठेवता येतील.
सरकारी कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थितीत, खासगी कार्यलायांनाही हीच अट लागू.
विविध खेळांसाठी सकाळी 5 ते 9, संध्याकाळी 6 ते रात्री 9 ही वेळ असेल.
चित्रिकरणासाठी बयो *बबल बंधनकारक. संध्याकाळी 5 नंतर परवानगी नाही.
सामाजिक, सांस्कृतिक किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमांना संध्याकाळी 4 पर्यंत 50 टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.
लग्न समारंभात 50 लोक जण उपस्थित राहू शकतात.
अंत्यविधीला 20 लोक उपस्थित राहू शकतात.
सभा आणि निवडणुकांना 50 टक्क्यांची मर्यादा.
बांधकाम साईटवर उपस्थित कामगारांद्वारे काम सुरू ठेवता येईल. मात्र दुपारी 4 नंतर बंद करावं लागेल.
ई *कॉमर्स नियमित सुरू राहील.
कृषी क्षेत्राचं काम रोज संध्याकाळी 4 पर्यंत सुरु राहील.
सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेनं सुरू राहील.
जमावबंदी संध्याकाळी 5 पर्यंत, तर संचारबंधी संध्याकी 5 नंतर लागू असेल.
 
चौथ्या स्तरासाठी हे नियम :
अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) उघडी राहतील
अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं पुर्ण वेळ बंद रहातील
सिनेमागृह, मॉल पूर्णपणे बंद राहतील
हॉटेलमधील फक्त पार्सल सेवा सुरू राहील
सार्वजनिक उद्याने, मैदाने, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 सुरू रहातील (सोमवार ते शुक्रवार)
अत्यावश्यक सेवेतील खाजगी कार्यालयात फक्त 25 टक्के उपस्थिती राहील
शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थिती
विविध खेळ (आऊटडोअर) सकाळी 5 ते 9 (सोमवार ते शुक्रवार) सुरु राहतील
कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमालाल परवानगी नाही
लग्न सोहळ्यासाठी 25 लोकांची उपस्थिती, अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांची उपस्थिती बंधनकारक
राजकीय किंवा इतर बैठका 50 टक्के क्षमता राहील
ज्या ठिकाणी कामगारांच्या रहाण्याची सोय आहे अश्याच ठिकानाची बांधकामं सुरू रहातील
कृषी कामे दुपारी 2 वाजेपर्यंत (सोमवार ते शुक्रवार) सुरू राहतील.
ई कॉर्मस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील
सलून आणि जीम 50 टक्के क्षमता सुरू राहील पण एसीचा वापर करता येणार नाही
सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. उभे प्रवासी नाही
संचारबंदीचे नियम लागू राहतील
 
पाचव्या स्तरात अद्याप एकही जिल्हा नाहीय.