मंगळवार, 21 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified मंगळवार, 25 मे 2021 (13:01 IST)

पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, पेट्रोलचे दर शंभरी पार केलेले जिल्हे

सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. डिझेलच्या किंमतीत 25 पैसे लीटर प्रति लीटर तर पेट्रोलच्या किंमतीत 23 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे. रविवारी पेट्रोलचे दर 15 ते 17 पैसे दर डिझेलचे दर 25 ते 29 पैशांनी महागले होते.
 
हरियाणामध्ये 25 मे रोजी पेट्रोलची किंमत 90.76 रुपये प्रतिलिटर होती त्याचबरोबर डिझेलची किंमत प्रति लिटर 84 84.40 रुपये झाली आहे. राजधानी चंदीगडमध्ये डिझेलची किंमत 83.98 रुपये आणि पेट्रोलची किंमत प्रति लिटर 89.88 रुपये करण्यात आली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 99.71 रुपये आणि डिझेल 91.57 रुपये प्रति लीटर
 
पेट्रोलचे दर शंभरी पार केलेले जिल्हे
परभणीमध्ये पेट्रोल 102.09 रुपये आणि डिझेल 92.46 रुपये प्रति लीटर
सिंधुदुर्गमध्ये पेट्रोल 101.20 रुपये आणि डिझेल 91.63 रुपये प्रति लीटर
नांदेडमध्ये पेट्रोल 101.00 रुपये आणि डिझेल 92.26 रुपये प्रति लीटर
रत्नागिरीमध्ये पेट्रोल 101.99 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर
जळगावमध्ये पेट्रोल 100.86 रुपये आणि डिझेल 91.28 रुपये प्रति लीटर
नाशिकमध्ये पेट्रोल 101.19 रुपये आणि डिझेल 90.63 रुपये प्रति लीटर
वर्धामध्ये पेट्रोल 100.17 रुपये आणि डिझेल 90.55 रुपये प्रति लीटर
 
पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात.