शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (14:38 IST)

RBI अलर्ट! बँकेची ही सेवा आज रात्रीपासून 14 तास बंद ठेवली जाईल, आवश्यक काम आधीपासूनच करुन घ्यावे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँक ग्राहकांसाठी विशेष माहिती जारी केली आहे. केंद्रीय बँकेने सांगितले की बँकांनी ही माहिती त्यांच्या ग्राहकांना अगोदरच पुरवावी, जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांनी त्यांचे काम आगाऊ करुन घ्यावे.
 
जाणून घ्या RBI ने काय म्हटले ?
RBIने एक प्रसिध्दीपत्रक जारी केले आहे. NEFT सेवेची कार्यक्षमता आणि नियमन सुधारण्यासाठी टेक्निकल अपग्रेड केले जात असल्याचे त्यात म्हटले आहे. हा अपग्रेड 22 मे 2021 रोजी व्यवसाय बंद झाल्यानंतर होईल. यामुळे, एनईएफटी सेवा 22 मेनंतर संध्याकाळी 12 वाजेपासून रविवार दि. 23 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत उपलब्ध होणार नाही.
 
ग्राहकांकडे हे पर्याय असतील
आरबीआयच्या म्हणण्यानुसार या काळात RTGS यंत्रणा कार्यरत राहील. केंद्रीय बँकेने असेही म्हटले आहे की यावेळी RTGS (Real Time Gross Settlement) सेवेवर परिणाम होणार नाही आणि ती सामान्य पद्धतीने सुरू राहणार आहे. यापूर्वी 18 एप्रिल रोजी आरटीजीएस संदर्भात असेच टेक्निकल अपग्रेड पूर्ण झाले आहे. आरबीआय म्हणाले की बँकांनी आपल्या ग्राहकांना ही माहिती आगाऊ पुरवावी, जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांनी त्यांचे काम आगाऊ करुन घ्यावे.