शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 मे 2021 (15:32 IST)

जम्बो कोविड सेंटर मधून पैसे व महत्वाची कागदपत्रे चोरीला, गुन्हा दाखल

जम्बो कोविड सेंटरमधून मृत रुग्णांचे मौल्यवान साहित्य चोरीला जात असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून समोर येत होत्या. याप्रकरणी आता रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
महेंद्र विश्वासराव फणसे (वय 51, रा. टिंगरे नगर, धानोरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सास-यांना कोरोनाची बाधा झाली, त्यानंतर 08 एप्रिल 2021 रोजी त्यांना उपचारांसाठी जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी (दि.09) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जवळील साहित्य सेंटर मधून चोरीला गेले आहे. यामध्ये रोख रक्कम दहा हजार रुपये, पॅनकार्ड, आधार कार्ड, पॉलिसी कार्ड, एटीएम अशा गोष्टींचा समावेश होता. असे फिर्यादीत म्हटले आहे.
 जम्बो कोविड सेंटर मधून पैसे व महत्वाची कागदपत्रे चोरीला, गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवडक्राईम न्यूजठळक बातम्या  जम्बो कोविड सेंटरमधून मृत रुग्णांचे मौल्यवान साहित्य चोरीला जात असल्याच्या तक्रारी काही दिवसांपासून समोर येत होत्या. याप्रकरणी आता रोख रक्कम व महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.