बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 एप्रिल 2021 (07:53 IST)

पीपीई कीट घालून ‘रेमडेसिव्हिर’ची चोरी, असा लागला छडा

नाशिक येथे गंगापूररोडवरील श्री गुरुजी रुग्णालयात पीपीई कीट घालून रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकी वरखेडे या मुख्य संशयितासह त्याला मदत करणारे रुग्णालयातील कर्मचारी ओटी मदतणीस सागर सुनिल मुटेकर आणि वॉर्ड बॉय गणेश गंगाधर बत्तीसे यांना अटक केली आहे.
 
गंगापूररोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री गुरुजी रुग्णालयातून रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चोरी झाली. नर्सिंग काऊंटरवर औषधाच्या बॉक्समध्ये ठेवलेले राजेश विश्वकर्मा या रुग्णाचे इंजेक्शन एका व्यक्तीने पीपीई कीट घालून येत चोरुन नेले. रुग्णालय प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर प्रशासनाने तत्काळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे शहानिशा केली. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिस पथकाने या गुन्ह्याचा छडा लावला. वरखेडेसह मुटेकर आणि बत्तीसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांची सखोल चौकशी केली. त्यात तिघांनीही गुन्हा कबूल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून दोन मेरडेसिव्हिर इंजेक्शनही जप्त करण्यात आले आहेत. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.