Cyclone Yaas रेल्वेने या 25 गाड्या केल्या रद्द
Tauktae चक्रीवादळाच्या विध्वंसातून देश अजून सावरलेला नाही तर आता आणखी एक भयानक चक्रीवादळ Yaas चं पूर्व किनारपट्टीवर सावट आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून 24 मे पर्यंत त्याचं चक्रीवादळात रुपांतर होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
25 मे पर्यंत यास चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते अतीतीव्र चक्रीवादळ बनेल म्हणजेच तिथे वारे ताशी 118-165 किमी वेगानं वाहण्याची शक्यता आहे. हे वादळ 26 मे रोजी ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, धोका लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने 25 गाड्या रद्द केल्या आहेत.
भारतीय रेल्वे प्रशासनाकडून काही रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्व रेल्वेनं 24 मे ते 29 मे दरम्यान चालणाऱ्या 25 रेल्वेगाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियाद्वारे रेल्वे प्रशासनानं ही घोषणा केलीय. यामध्ये बिहारच्याही काही गाड्यांचा समावेश आहे.
यास चक्रीवादळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्व रेल्वेकडून रद्द करण्यात आलेल्या २५ गाड्यांची यादी
हे वादळ 26 मेच्या संध्याकाळपर्यंत किनाऱ्याला भारताच्या मुख्य भूमीच्या पूर्व किनाऱ्याला धडकेल. बंगाल आणि उत्तर ओडिशासोबतच शेजारच्या बांगलादेशाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं होतं आणि वाटेत त्यानं केरळपासून अगदी उत्तर कोकणापर्यंत ठिकठिकाणी किनारी प्रदेशांत मोठं नुकसान केलं. किनाऱ्याला धडकल्यावरही तौक्तेचा प्रभाव राजस्थान, मध्यप्रदेशपर्यंत जाणवला होता.