बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 24 एप्रिल 2023 (10:33 IST)

Maharashtra Weather Forecast: :येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

cyclone
सध्या राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात पुढील 5 दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. राज्यात विदर्भातील काही भागात गारपिटीची शक्यता देखील हवामान खात्यानं वर्तवली आहे. विदर्भात येत्या 5 दिवसात हलके ते मध्यम अवकाळी पावसाचे सावट आहे. या भागात विजांच्या कडकडाटांसह, मेघसरी कोसळणार. तसेच येत्या 2 ते 3 दिवसात गारपीटसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 
 
 
विदर्भात येत्या 5 दिवस अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून या भागात तापमानात घट होऊन उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 
विदर्भात येत्या 2 ते3 दिवसात मेघ गर्जना,विजार,जोरदार  वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता येत्या २,३ दिवसात वर्तवण्यात आली आहे.


Edited by - Priya Dixit