रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (12:01 IST)

Weather Update राज्यात पुढचे दोन दिवस पावसाचे

rain
Weather Update राज्यात पुढील दोन दिवस गोवा, कोकण आणि मध्य महाराष्टरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावासाचा अंदाज आहे. अशात पुढील 2 दिवस राज्यातील नागरिकांना आपले स्वेटर घालावे की रेनकोट बाहेर काढावे हा विचार करावा लागणार आहे.
 
बंगालच्या उपसागरावरून आग्नेय दिशेने राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. 23 नोव्हेंबरनंतर बाष्पयुक्त वारे राज्यात येणार असून 24 नोव्हेंबरला राज्यभरात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
 
अशात आजपासून पुढील दोन-चार दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानात वाढ होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.