शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 (10:58 IST)

Major accident in Malshej Ghat माळशेज घाटात मोठा अपघात

accident
Major accident in Malshej Ghat कल्याण ते नगर महामार्गावर माळशेज घाटात भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरुन येणाऱ्या एसटीबसला जोरात धडक दिल्याने  झालेल्या अपघातात एसटी बस मधील 15 ते 20 प्रवासी गंभीर रित्या जखमी झाले आहेत.अपघात एवढा भीषण होता की एसटी बसला धडक दिल्याने नंतर ट्रक पलटी झाला आहे.व एसटी बस च्या कॅबीनचा भागाचा चुराडा झाला आहे.
 
दरम्यान अपघात प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार कल्याण वरुन ठाणे डेपोची एसटी बस क्रंमांक एम‌एच.14 बी‌टी 2478 हि शिरोळी  कडे जात असताना भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरुन येणाऱ्या  एसटी बसला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला.नतंर ट्रक पलटी झाला आहे.या अपघातात एसटी बसच्या कॅबीनचा चुराडा झाला आहे.अपघात रात्रीच्या वेळी झाला आहे.अपघातात एसटी बस मधील 15 ते 20 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारा करीता रुग्णांलयात दाखल केले आहे.या मार्गावरील सिमेंट रोडचे काम सुरू असून एकेरी वाहतूक सुरू आहे.त्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते.अपघात ग्रस्त जखमी प्रवाशांना पोलिस व ग्रामस्थ यांनी तातडीने आळेफाटा ओतूर व नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल केले आहेत.