गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: वाराणसी , बुधवार, 4 ऑक्टोबर 2023 (10:45 IST)

Road Accident कार आणि ट्रकची धडक, भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

accident
Road Accident  उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भीषण रस्ता अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू झाला, तर तीन वर्षांचा निष्पाप बालक गंभीर जखमी झाला. मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फुलपूर पोलीस ठाण्याच्या कारखियाव येथे भरधाव वेगात असलेल्या एर्टिगा कारची ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात नेले, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षांच्या निष्पाप बालक वगळता कारमधील सर्व आठ जणांचा मृत्यू झाला. सर्व बळी पिलीभीत येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बुधवारी सकाळी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्यानंतर बनारसहून जौनपूरला जात असताना फुलपूर पोलीस ठाण्याच्या कारखियावजवळ हा अपघात झाला. सध्या पोलीस अपघाताचा तपास करण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसीतील या वेदनादायक रस्ता अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो, अशी कामना करत मुख्यमंत्र्यांनी शोकाकुल परिवाराप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमी बालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.