रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मे 2023 (21:02 IST)

मालेगाव: पित्याने सहा वर्षांच्या चिमुरड्यासह विहीरीत दिला जीव

मालेगाव तालुक्यातील आघार-ढवळेश्वर येथे पित्यानेआपल्या सहा वर्षांच्या चिमुरड्यासह विहीरीत जीव दिला आहे. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. पित्याने हे असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत लक्ष्मण हिरे असे या पित्याचे नाव आहे. हिरे यांनी आपल्या सहा वर्षीय मुलाला सोबत घेत अंजग येथील शेती महामंडळाच्या विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. यशवंत हिरे हे पशु खाद्य विक्रीचा व्यवसाय करत होते.
 
गुरुवारी ते मुलाला सोबत घेऊन निघाले. अंजग येथे त्यांनी आपली पिकअप वाहन उभे केले. त्यानंतर अनेक तास गाडी उभी असल्याने परिसरातील स्थानिकांना संशय आला. त्यांनी विहिरीजवळ जाऊन पाहिले असता ही घटना उघडकीस आली. वडनेर-खकुर्डी पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी अग्निशामक दलातील जवानांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. या प्रकरणी वडनेर-खकुर्डी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहेत.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor