शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (12:49 IST)

चारित्र्याच्या संशयावरून सुंदर पत्नीला 10 वर्षे ठेवले डांबून

rape
चारित्र्यावर संशय घेत विकृत पतीने पत्नीला तब्बल दहा वर्षांपासून घरात डांबून ठेवले. बीडमध्ये हा प्रकार सोमवारी उघड झाला. सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांची मदत घेत महिलेची सुटका केली असून तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
 
जालना रोड परिसरात एका 40 वर्षीय महिलेला पतीने गेल्या दहा वर्षांपासून तिला घरातच डांबून ठेवल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. संगीता धसे यांना मिळाली होती. सोमवारी सकाळी त्यांनी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार देत पोलिसांसह महिलेचे घर गाठत तिची सुटका केली.
 
पीडितेला दोन मुले आहेत आणि पती कोणताही कामधंदा करत नाही. चारित्र्यावर संशय घेत त्याने दहा वर्षांपासून पत्नीला घराबाहेर पडू दिले नाही. दरम्यान अनेकदा तिला मारहाण केली, बांधूनही ठेवले. दोन मुलेही वडिलांच्या दहशतीमुळे आईवर होत असलेल्या अन्यायाबाबत कुठे बोलले नाही. पीडिता मागील तीन दिवसांपासून उपाशी होती. तिला बाहेर काढून पोलिसांनी तिला जेवू घातले. तसंच पतीविरोधात जबाब दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.