गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 26 डिसेंबर 2021 (10:17 IST)

'शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या हुकूमशाही सरकारला जनशक्तीने झुकवले'

'Manpower tilts dictatorial government that puts farmers in trouble' 'शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या हुकूमशाही सरकारला जनशक्तीने झुकवले'  Marathi Regional News  In Webdunia MArathi
चर्चेविनाच कृषी कायदे मंजूर करून सरकारनं शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जनशक्तीसमोर या हुकूमशाही सरकारला झुकावं लागलं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.
सध्याच्या काळात नैसर्गिक आपत्तींमुळं शेतीचा धंदा परवडत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांची स्थिती बदलायची असेल तर शेतीचं अर्थकारण बदलण्याची गरज असल्याचंही पवार म्हणाले.
सहकार महर्षी साहेबराव सातकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते झालं. त्यावेळी पवारांनी विविध विषयांवर मतं मांडली.
भविष्यामध्ये जर रोजगार मिळवायचा असेल तर पारंपरिक शिक्षणाबरोबरच तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार असल्याचंही ते म्हणाले.