1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (15:23 IST)

भुजबळ यांचे अनेक मिश्किल प्रश्न......आणि आरोग्य मंत्र्यांची भंबेरी

chagan bhujbal
सरकारने एकूण किती डास पकडले… डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले…यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत. डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का ? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का ? अशा अनेक मिश्किल प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची विधानसभेत भंबेरी उडाली.
 
पालघर जिल्ह्यातील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता शासनाने काय उपाययोजना केली यावर लेखी उत्तरात सरकारने निवडक भागातील डास पकडून त्याचे वर्गीकरण केले, विच्छेदन केले, व डास घनता काढली असे उत्तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज सभागृहात दिले. या उत्तरानंतर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत सावंत यांना कोंडीत पकडले. डासांचे वर्गीकरण आणि विच्छेदन यावरून प्रश्नांची सरबत्ती केली. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अचानक आलेल्या या प्रश्नांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत गोंधळले आणि सभागृहात एकच हशा पिकला.