राज्यभरात वळवाच्या पावसाचा कहर
Maharashtra News: देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. देशातील काही भागात पाऊस पडत आहे तर काही भागांमध्ये उष्णता भडकली आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या या अवकाळी पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.
तसेच महाराष्ट्रात देखील अवकाळी पाऊस सध्या जोर धरत आहे. कडक उन्हापासून अराम मिळत असला तर मे महिन्यात पडणाऱ्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे भुईमुग, मूग आणि हरभरा पिके ओली झाली
महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या अवकाळी पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तहसीलमधील बाजार समितीत विक्रीसाठी आणलेले शेतकऱ्यांचे मौल्यवान धान्य - भुईमुग, मूग, चणे आणि तूर हे मुसळधार पावसामुळे उघड्यावर पडून राहिल्याने ते पूर्णपणे भिजले.
शेतात केलेले कष्ट आणि बाजारपेठेपर्यंतचा प्रवास, हे सर्व काही अवघ्या काही मिनिटांच्या पावसातच उद्ध्वस्त झाले आहे. अवकाळी पावसाच्या या विनाशकारी परिणामामुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे की शेतकऱ्यांचे धान्य कृषी बाजारात सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस व्यवस्था कधी येईल? जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत, तोपर्यंत प्रत्येक पाऊस शेतकऱ्यांसाठी एक नवीन आपत्ती ठरत राहील.
तसेच राज्यासह देशभरात हवामानत मोठे बदल होत असल्याचे बघायला मिळतं आहे. अशातच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना वळवाच्या पावसानं अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे.
Edited By- Dhanashri Naik