शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :सोलापूर , शनिवार, 3 जुलै 2021 (13:48 IST)

मराठा आक्रोश मोर्चा : सोलापुरात उद्या कडक संचारबंदी

मराठा क्रांती मोर्चाच्याचवतीने येत्या रविवारी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात दिवसभर कडक संचारबंदी व पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. याबाबत कलम 144(1)(3) फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 प्रमाणे मनाई आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी काढले आहेत. 
 
सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यातील तरतुदीच्या अंलबजावणीसाठी अधिसूचना दिलेली आहे. शहर व जिल्ह्यात पहिल्या व दुसर्या लाटेत अनेकजणांनी कोरोनाच्या नियमांचे पालन न केल्याने जीव गमावला. जिल्ह्यात कोविड डेल्टाचे रुग्ण सापडत आहेत. सोलापूर शहरातील नागरिकांनी नियमांचे पालन करुन रुग्णसंख्या कमी करण्याकामी आपले योगदान दिले आहे. रविवार, 4 जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामुळे गर्दी होणार असून कोरोना विषाणू संक्रमण होऊ शकते व अनेकांच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा डेल्टाप्लसचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांनी निर्बंध लागू केले आहेत. या आदेशामध्ये सर्व प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांना परवानगी राहणार नाही. तसेच अतवश्क सेवा वगळता इतर सर्व सेवा हे प्रत्येक शनिवारी व रविवारी पूर्णतः बंद ठेवण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता सोलापूर शहरात 4 जुलै रोजी 00.01 वाजल्यापासून ते 4 जुलै रात्री 24.00 वाजेपर्यंन (शनिवारी रात्री बारा ते रविवारी रात्री बारा वाजेपर्यंत) आदेश लागू करण्यात येत आहे. त्यानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सार्वजनिक ठिकाणी येण्यास मनाई राहील. शहरात येणार्यात सर्व प्रकारच्या वाहनांना (अत्यावश्यक सेवा वगळून) प्रवेशासवाहतुकीस बंदी राहील, असे पोलीस आयुक्त  शिंदे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.