शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (08:56 IST)

विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना नेवासा तालुक्यातील सोनई येथे घडली.
दिपाली गणेश गडाख (वय 24 वर्षे, रा. वांबोरी सोनई रोड, ता. नेवासा, हल्ली रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 21 नोव्हेंबर 2016 नंतर एक वर्षापासून ते 25 एप्रिल 2021 या दरम्यान सौ. दिपाली गडाख हिने बांधकाम करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. तिला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन घरातून बाहेर हाकलून दिले.
सासरच्या लोकांकडून होत असलेला त्रास सहन न झाल्याने दिपाली गणेश गडाख या विवाहित तरूणीने राहुरी पोलिसात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरून आरोपी पती गणेश देवीदास गडाख, सासू मंदा देवीदास गडाख,सासरे देवीदास नारायण गडाख, मामा सासरे अर्जुन गणपत ढूस रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, नणंद मंगल किशोर बंगाळ रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर, मावस दीर अंकुश घाडगे रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी.या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बबन पवार हे करीत आहेत.