1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Megablock on Konkan railway line trains will run with delay

कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, रेल्वेगाड्या विलंबाने धावणार

कोकण रेल्वेवरील सावर्डा-रत्नागिरी विभागात देखभाल-दुरुस्तीच्या कामानिमित्त २३ फेब्रुवारी रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ७ ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत २.३० तासांचा मेगाब्लॉक असेल. त्यामुळे कोकण रेल्वेवरील रेल्वे गाड्या विलंबाने धावतील.
 
गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसचा प्रवास २२ फेब्रुवारी रोजी मडगाव दरम्यान १.४५ तासांसाठी थांबवण्यात येईल. तर, गाडी क्रमांक २०९२३ तिरुनेलवेली – गांधीधाम एक्स्प्रेसचा प्रवास २२ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव दरम्यान १.१० तासांसाठी थांबवण्यात येईल. त्यामुळे या दोन्ही रेल्वे गाड्यांसह इतर गाड्या  उशिरा धावतील.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor 
 
पुढील लेख
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी