मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 एप्रिल 2022 (21:59 IST)

खुशखबर! मिरज-कोल्हापूर पॅसेंजर उद्यापासून सुरू

Miraj-Kolhapur passenger starting from tomorrow
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली मिरज-कोल्हापूर आणि कोल्हापूर-मिरज पॅसेंजर रेल्वे सेवा गुरूवारी दि. 15 एप्रिलपासून पूर्ववत प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. मिरज-कोल्हापूर आणि कोल्हापूर-मिरज या पॅसेंजरच्या नियमित फेऱ्या सुरू होत आहेत. या पॅसेंजर रेल्वे गाडीमुळे मिरज-कोल्हापूर मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱया शेकडो कामगार, नोकरदार, उद्योग-व्यवसायिकांसह सामान्य प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.
 
सध्या कोरोना संसर्ग पूर्णत: नियंत्रणात आल्याने शासनाकडून बहुतांशी निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. बहुतांशी रेल्वे सेवाही पूर्ववत होत आहे. निर्बंधातून मिळालेली शिथिलता आणि प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर-मिरज मार्गावर पॅसेंजर रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मिरज-कोल्हापूर (गाडी क्र. 01543) पॅसेंजर दररोज दुपारी 2.14 वाजता सुटून दुपारी सुटून 3.30 वाजता कोल्हापूरला पोहचेल. तर कोल्हापूर-मिरज पॅसेंजर (04544) दररोज सकाळी 10.30 वाजता कोल्हारातून सुटून दुपारी 11.45 वाजता मिरज जंक्शनवर पोहचले. या पॅसेंजर रेल्वेला जयसिंगपूर, तमदलगे, हातकणंगले, रुकडी, गांधीनगर (वळीवडे) या स्थानकांवर थांबे असतील. या रेल्वे गाडीमुळे सामान्य प्रवाशांसाठी नोकरदार आणि कामगार वर्गाची चांगली सोय.