बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2024 (08:54 IST)

गायकवाडांची बंडखोरी, दोन अर्ज भरले

बुलडाणा : बारामतीमध्ये विजय शिवतारे, अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात दंड थोपटलेले असताना बुलडाण्यात थेट बंडखोरीच करण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा ताप वाढला आहे.
 
महायुतीमध्ये बंडाचे निशाण शिवसेनेनेच आधी रोवल्याने वातावरणही तापण्याची चिन्हे आहेत.
 
शिवतारे, अडसूळ यांच्या भेटी घेऊन शिंदे, फडणवीस यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. अद्याप या दोघांनीही माघार घेतलेली नाही. तोच बुलडाण्यामध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
 
शिंदे गटाची अद्याप लोकसभेची यादी आलेली नाही. तरीही गायकवाडांनी अर्ज भरल्याने आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या जागेवरून प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे खासदार आहेत. यामुळे जाधवांचे तिकिट कापले जाणार की गायकवाडांना बंडखोर घोषित केले जाणार, याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. या बंडखोरीमुळे शिवसेनेतच वर्चस्ववाद सुरू असल्याचे समोर आले आहे.
 
Editedb by Ratnadeep Ranshoor