सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मार्च 2024 (08:51 IST)

शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

eknath shinde
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या शिवसेनेने  आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत 8 जणांचा समावेश आहे.
 
शिवसेनेने जाहीर केलेल्या यादीत कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने,  मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, मावळमधून श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हिंगोलीतून हेमंत पाटील, बुलडाणातून प्रतापराव जाधव आणि शिर्डीतून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आलेला नाही. दरम्यान, या यादीत रामटेकचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्याऐवजी राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.