बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 ऑगस्ट 2020 (14:56 IST)

किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार?- राज ठाकरे

तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने अजूनही जिम चालकांना जिम सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक राज्यात आंदोलन करत आहेत.
 
जिम व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा गंभीर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जिम चालक आणि मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली.
 
गोल्फ, टेनिस इतकं फिजिकल डिस्टन्सिंग कुठल्या खेळात नाही पण ते सुद्धा बंद आहे, याकडे राज यांनी लक्ष वेधलं. “बाजार सुरु आहेत. सगळीकडे सगळया गोष्टी सुरु आहेत. मूर्खाचा बाजार सुरु आहे. केंद्र सरकार सांगत सुरु करा, राज्य सुरु करायला तयार नाही. मागे केंद्राने विमानतळ सुरु करायला सांगितला पण राज्य तयार नव्हतं. राज्याला वेगळी अकक्ला आहे का ?” असा सवाल त्यांनी केला.