चाकरमान्यांसाठी मनसेकडून खासगी गाड्या

travels buses
Last Modified शनिवार, 8 ऑगस्ट 2020 (17:55 IST)
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दादरमधून मनसेकडून खासगी गाड्या सोडण्यात आल्या. मुंबईत विविध भागांमधून जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी जवळपास २५० बसेसची व्यवस्था मनसेकडून करण्यात आली आहे. यादरम्यान मनसेकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रवाशांना प्रोटेक्शन कीट दिली जात आहे.
दादरमधून मनसे बस सेवेला प्रारंभ झाला आणि पहिली बस कोकणकडे रवाना झाली. हा उपक्रम मनसे आणि महापालिका कामगार सेनेच्या वतीने राबवण्यात आला आहे.

‘गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये संभ्रम अवस्था आणि नाराजी होती. कारण सरकारकडून त्यांना कोणतही ठोस उत्तर दिलं जात नव्हतं. एसटी बसेस जाणार आहेत की नाही? किती दिवस अगोदर जाणार आहेत? किती दिवस क्वारंटाईन केले जाणार आहे?. जेव्हा सरकारकडून लोकांना योग्य उत्तर मिळतं नव्हतं त्यावेळेला मनसे नेहमी प्रमाणे पुढे धावून आली. त्यामुळे विविध भागांमधून कोकणवासियांसाठी मनसेकडून बसेस सोडल्या जात आहेत’, असं मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.
‘जवळपास १० ते १५ बसेस दादरमधून सुटणार आहेत. उर्वरित बसेस ठाणे, बोरिवली, भांडूप अशा विविध भागातून सोडण्यात येणार आहे. २०० ते २५० बसेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कोकणवासियांसाठी सोडण्यात येणार आहेत. बसमध्ये बसण्याची क्षमता ४८ ते ५० लोकांची असली तरी आम्ही २४ लोकांना एकाच बसमधून सोडले जात आहे’, अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. या बसेस चिपळून, महाडपासून कणकवली-सावंतवाडीपर्यंत जाणार आहेत.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

जितेंद्र आव्हाड: शरद पवारांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे

जितेंद्र आव्हाड: शरद पवारांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे
शरद पवार यांचा जन्म जनसेवेसाठीच झाला आहे, असं राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे ...

अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल

अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात ...

भयंकर : आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा आवळला

भयंकर : आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा गळा आवळला
सांगलीतील सिव्हिल रुग्णालयामध्ये जन्मदात्या आईनेच ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या गोंडस मुलीचा ...

हॉटेल, बारसाठी किमान रात्री साडेअकरापर्यंतची वेळ वाढवून

हॉटेल, बारसाठी किमान रात्री साडेअकरापर्यंतची वेळ वाढवून द्या
रात्रीच्या वेळेतच हॉटेल, रेस्टॉरंटचा निम्म्याहून अधिक व्यवसाय होतो. मद्यालयामध्ये (परमिट ...

धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभे आहे : ...

धीर सोडू नका प्रशासन तुमच्यासोबत खंबीर पणे उभे आहे : मुख्यमंत्री
राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी ...