सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (15:36 IST)

सोनं 55 हजाराच्या पुढं तर चांदीची 70 पर्यंत वाढले

सोन्या-चांदीचे भाव गगनाला पोहोचल्यामुळे सर्वसामान्यांना आता दागदागिने खरेदी करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळ्या मौल्यवान धातूने प्रति औन्स 2,000 डॉलरचा टप्पा ओलांडल्याने भारतात सोन्याचे दर तोळ्यासाठी 55 हजार रुपयांच्या पुढे गेले. चांदीचे दरही 70 हजारांवर गेले आहेत.
 
कमकुवत डॉलर आणि सुरक्षित पर्याय म्हणून सोने, सोनेरूपातील गुंतवणूक पर्यायाकडील ओघ मौल्यवान धातूला विक्रमी टप्प्यापुढे घेऊन जात आहे. मुंबईच्या सराफा बाजारात स्टॅण्डर्ड सोन्याचा भाव बुधवारअखेर 10 ग्रॅमसाठी 55,226 रुपयांवर पोहोचला. तर शुद्ध सोने तोळ्यासाठी 55,448 रुपये होते. शहरात चांदी किलोमागे 71,200 रुपयांपर्यंत पोहोचली होती. मौल्यवान धातू प्रथमच उच्चांकी दरटप्प्यावर पोहोचला आहे. सोन्याच्या किंमती चालू वर्षांत आतापर्यंत 30 टक्कयांहून अधिक वाढल्या आहेत. रोख्यांवरील व्याज कमी होत असतानाच अनेक देशांकडून जाहीर होणार्‍या सरकारी सवलती, अर्थसाहाय्याच्या जोरावर सोने तसेच चांदीला मागणी येत आहे. भारतात सोने दर तोळ्यासाठी आठवडयाच्या आतच 50 हजार ते 55 हजार रुपये झाले आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे अवघ्या दोन दिवसात 8 हजार रुपयांची भर पडली आहे.