सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (16:17 IST)

यंदा गणेशोत्सवासाठी मनसेचा 'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी' उपक्रम

यंदाच्या गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांकरीता नवा उपक्रम राबवला आहे. 'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी' असं म्हणतं यंदा मनसैनिक तुमच्या घरी बाप्पा घेऊन येणार आहेत. याबाबत नितीन सरदेसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. 
 
या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माहीम विधानसभेतर्फे ‘आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी’ हा अभिनव उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमांतर्गंत गर्दी टाळण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली जात आहे. गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी कारखान्यातून बाप्पाची मूर्ती आणली जाते. यावेळी कारखान्यात गर्दी होते ही गर्दी टाळण्यासाठी मनसैनिक तुमचा बाप्पा तुम्हाला घरी आणून देणार आहेत. 
 
एकाच व्यक्तीला गणरायाची मू्र्ती आणण्यासाठी जावं लागणार आहे. तसेच ज्येष्ठ व्यक्तींना घराबाहेर पडणंही कठीण होणार आहे. तसंच या दिवसांत टॅक्सी उपलब्ध होणं देखील शक्य नाही. अशा परिस्थितीत मनसेने हा नवा उपक्रम राबविला आहे.  माहिम ते प्रभादेवी या परिसरातील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. लवकरच मनसे यासंदर्भात  संपर्क क्रमांक देणार आहे. त्या नागरिकांना त्यांचा बाप्पा कारखाना ते घरपोच आणून दिला जाणार आहे.