सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (13:49 IST)

कोरोना काळात मंदिरात जाणे शक्य नसेल तर करा शिखर दर्शन, पुण्य लाभेल

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान मांडला आहे अशात प्रथमच मंदिर देखील बंद करण्याची पाळी आली. अनेक ठिकाणी मंदिर आता भक्तांसाठी उघडले असले तरी काही ठिकाणी अजून देखील देवळात प्रवेश दिला जात नाहीये किंवा अनेक लोक संसर्गाच्या भीतिने मंदिरात जाणे टाळत आहे. परंतू मनाला देवदर्शनाची रुख-रुख लागणे साहजिकच आहे. अशात मंदिराच्या बाहेरुन शिखर दर्शन देखील घेतले तरी पुण्य लाभ प्राप्त होईल.
 
अनेक ज्योतिषाचार्यांप्रमाणे शिखर देखील मूर्तीसमान पुण्य देणारे मानले गेले आहे. ग्रंथांमध्ये देखील उल्लेख आहेकी शिखर दर्शनम् पाप नाशम् । अर्थात मंदिराच्या मात्र शिखर दर्शनाने देखील पाप नाहीसे होतात.
 
मंदिराचे शिखर दर्शन करताना आपल्या इष्टदेवताच्या मंत्राचा जप करावा. मंत्र जप किंवा नामस्मरण करत‍ शिखर दर्शन केल्याने देखील मंदिरात जाऊन दर्शन केल्यासम पुण्य लाभ प्राप्ती होते.