रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मार्च 2020 (16:39 IST)

मोदी सोशल मीडिया सोडणार नाही, ट्विटचा असा आहे अर्थ

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडिया सोडणार नाहीत. कारण त्यांनी केलेलं एक नवं ट्विट समोर आलं आहे. सोमवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये सोशल मीडिया सोडण्याचा विचार करतो आहे असं त्यांनी म्हटलं होतं. ते असं का म्हणाले त्याचं कारण आता समोर आलं आहे.
 
#SheInspiresUs असा हॅशटॅग मोदींनी ट्विट केला आहे. ८ मार्च म्हणजेच रविवारी महिला दिनाच्या दिवशी आपली सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करायला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडिया सोडणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.
 
या महिला दिनाच्या दिवशी माझी सगळी सोशल मीडिया अकाऊंट्स महिलांना हँडल करण्याच्या दृष्टीने विचार करतो आहे. महिला या जगाला प्रेरणा देणाऱ्या ठरल्या आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यात प्रेरणा ठरलेल्या महिलांचा फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा आणि त्यासोबत #SheInspiresUs हा हॅशटॅग जोडायचा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं आहे.
 
त्या व्हिडीओजमधल्या निवडक व्हिडीओंमधील महिलांना नरेंद्र मोदी यांची सोशल मीडिया अकाऊंट्स ऑपरेट करता येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच ट्विटर अकाऊंटवरुन या संदर्भातलं ट्विट करण्यात आलं आहे.