रविवार, 10 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मार्च 2020 (16:20 IST)

फडणवीस यांच्यावर खटला चालणार

साल २०१४ सालच्या प्रतिज्ञा पत्रात गुन्हे लपविण्याचे प्रकरणी सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना धक्का दिला आहे. शपथ पत्रात दोन गुन्हे लपवल्याप्रकरणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खटला चालणार आहे. याला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. याआधी त्यांनी स्वतः या प्रकरणात जामीन मिळावा, म्हणून नागपूरच्या कोर्टात हजेरी लावली होती.
 
१८ फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने हा आदेश सुरक्षित ठेवला होता. आता तो न्यायालयाने दिला आहे. २०१४ सालच्या निवडणुकीदरम्यान माहिती लपविण्याचा गुन्हा केला होता. मात्र देवेंद्र फडणवीस यांची पुनर्विचार याचिका प्रलंबित होती. परंतु, त्यावर पुर्नविचार करणे गरजेचे नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. फडणवीस यांची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांना कोर्टात हजर राहून खरच त्यांनी प्रतिज्ञापत्रातील माहिती लपविली होती का? याचा खुलासा द्यावा लागणार आहे. यात ते दोषी ठरले तर सहा महिन्याची कैद किंवा दंड यापैकी कोणतीही शिक्षा होऊ शकते.