रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (10:45 IST)

मलिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांनी तलवार नाचवली, गुन्हा दाखल

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी आठ तासांच्या चौकशीनंतर अटक केली. भाजप नेत्यांवर आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना अटक होताच भाजप नेते मोहीत कंबोज यांच्या निवासस्थानाजवळ फटाके फोडून जल्लोष केला गेला तर यावेळी मोहित कंबोज हे तलवार नाचवताना दिसून आले. मात्र या प्रकारे तलवार नाचवणं मोहित कंबोज यांना महागात पडलं आहे.
 
याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला असून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून मोहीत कंबोज हे नाव चर्चेत आहे कारण संजय राऊतांनी मोहीत कंबोज यांचे नाव थेट भाजप नेते देवेंद्र फडणवीसांशी जोडलं. नंतर नवाब मलिक यांनी मोहित कंबोज यांच्यावर गंभीर आरोप केला होता.