मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: यवतमाळ , शनिवार, 20 ऑक्टोबर 2018 (09:36 IST)

यवतमाळ १० करोडची रोकड जप्त

महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील पिपरेवाडा टोल नाक्यावर 10 करोड रु ची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई तेलंगणा पोलिसांनी केल्याची माहिती आहे. 
 
आगामी काळात तेलंगणा राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून तेलंगणा निवडणुकीसाठी ही रक्कम जात असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीच्या आधारावरती महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्याच्या सीमेवर असलेल्या पिंपरेवाडा टोल नाक्यावरती वाहनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये मारूती ब्रेजा कर्नाटका पासिंग असलेल (के. ए. 46 एम. 6095) या वाहनांमधून 10 करोड रुपयांची रोकड वाहून नेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दहा करोड रुपयांची रोकड जप्त केली असून यामध्ये दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाई महाराष्ट्र व तेलंगणा पोलिस करीत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.