मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

पिंपळवृक्षाचे आध्यात्मिक महत्त्व

पिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते. असे म्हणतात की, ज्याच्या घरी पिंपळाचे झाड असेल त्या घराला दारिद्रय़ येत नाही आणि सुख-शांती तेथे वास करते. विज्ञानानेदेखील पिंपळवृक्षाचे महत्त्व विशद केले आहे. येथे आपण पाहणार आहोत पिपळवृक्षासंबंधीचे तंत्र उपाय, ज्यातून अनेक समस्यांचे निदान केले जाईल.
 
उपाय
 
धनप्राप्तीसाठी - पिंपळवृक्षाखाली शिव शंकराची प्रतिमा स्थापन करून त्यावर दररोज जलाभिषेक करावा. नियमित पूजा करावी आणि 'ओम नम: शिवाय' या मंत्राचा जप किमान ५ वेळा किंवा ११ वेळा करावा. त्यानंतर तुम्हाला स्वत:लाच त्याचा अनुभव येईल.
 
पुढे पहा हनुमानाच्या कृपाप्राप्तीसाठी....
हनुमानाच्या कृपाप्राप्तीसाठी- हनुमानाची तुमच्यावर कृपा व्हावी असे वाटत असेल तर पिंपळवृक्षाची पूजा करावी. पिंपळवृक्षाखाली बसून हनुमानाची पूजा करावी, यामुळे रामभक्त हनुमान प्रसन्न होतात अशी धारणा आहे. तसेच साधकाची मनोकामना पूर्ण होते.
 
शनीच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी- शनीच्या अवकृपेपासून वाचण्यासाठीही पिंपळवृक्षाची पूजा करणे उपयोगाचे ठरते. जर नियमित पिंपळवृक्षाला जलाभिषेक केल्यास शनिदोषापासून दूर राहता येते, शनिदेवाची शांती होते. शनिवारी संध्याकाळी पिंपळवृक्षाखाली दिवा लावावा.