रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By

प्रत्येक ग्राहकाच्या नावाने एक वृक्ष लावते हॉटेल

दिल्लीच्या क्लार्क्स ग्रुप ऑफ हॉटेलमध्ये तुम्ही जेवण करण्यासाठी गेलात तर हे हॉटेल पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी तुमच्या नावाने एक वृक्ष लावते. आपल्या हॉटेलमध्ये येणार्‍या प्रत्येक ग्राहकाच्या नावाने ते वृक्ष लावतात. व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर)नुसार वृक्षारोपणची ही मोहीम  चालवली जात आहे. एक ऑगस्टला या हॉटेलने 200 झाडे लावून या उपक्रमाला सुरुवात केली. 2018-19मध्ये 10000 झाडे लावण्याचे लक्ष्य या ग्रुपने ठेवले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हॉटेलकडून ही मोहीम चालवली जात आहे. हॉटेलने ठरवून दिलेल्या जागेवर हे वृक्षारोपण केले जाणार असून हे हॉटेलच त्याची देखभाल करणार आहे. पुढच्या वर्षासाठीसुद्धा हॉटेलने वृक्षारोपणाचे लक्ष्य ठरवले आहे. हॉटेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2019-20 मध्ये 10 हजार झाडे लावण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. क्लार्क्स ग्रुपचे प्रबंध निर्देशक अपूर्व कुमार यांनी सांगितले, की पर्यावरण स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आमच्या हॉटेलकडून राबवला जात आहे.