हॉरर-कॉमेडी असलेल्या ‘स्त्री’चा फर्स्ट लूक प्रदर्शित
अभिनेत्री श्रद्धा कपूर च्या आगामी ‘स्त्री’या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. ‘स्त्री’हा एक हॉरर-कॉमेडी असून या चित्रपटामध्ये श्रद्धा एका नव्या अंदाजात दिसून येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची तुलना ‘कॅंज्युरिंग’या सीरिजशी करण्यात येत आहे. या चित्रपटात राजकुमार राव श्रद्धाबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.
प्रदर्शित झालेल्या फर्स्टलूकमध्ये सर्वत्र
अंधार दिसत असून लाल रंगाच्या साडीमध्ये एक महिला हवेत तरंगतांना दिसून येत आहे. हे पोस्टर श्रद्धाने ट्वीटरच्या माध्यमातून शेअर केलं आहे. हा चित्रपट येत्या ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘स्त्री’च्या दिग्दर्शनाच्या जबाबदारी अमर कौशिकने उचलली असून दिनेश विजार या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.