सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2023 (23:22 IST)

Money Laundering Case: मुंबई-नागपूरमध्ये ईडीचे 15 ठिकाणी छापे

महाराष्ट्रात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्रात सर्च ऑपरेशन केले. ईडीने मुंबई आणि नागपूरमधील 15 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. आतापर्यंत 5.51 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.या छाप्यात रोकड , दागिने आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे.ईडीने ट्विट करून या कारवाईची माहिती दिली आहे. 
 
या छाप्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. ईडीने नागपूर आणि मुंबईसह 15 ठिकाणी छापे टाकले  आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे. . याशिवाय मुख्य लाभार्थ्यांचे कार्यालय व निवासी जागेवरही झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान 5.51 कोटी रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने, सुमारे 1.21 कोटी रुपयांची रोकड, डिजिटल उपकरणे आणि विविध गुन्हे दाखले जप्त करण्यात आले आहेत.
 
Edited By - Priya Dixit