महाराष्ट्रात पाऊस वाढणार, ६ जुलैपासून कोकण-पुणे-घाटात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैपासून कोकण, घाटमाथा, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
तसेच महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे आणि हवामान विभागाने पुढील काही दिवसांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. ६ जुलैपासून विशेषतः कोकण, घाटमाथा आणि पुणे विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैपासून कोकण, घाटमाथा, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर येथे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Edited By- Dhanashri Naik