1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 मे 2022 (10:27 IST)

आईनेच मुलांना विष पाजून आत्महत्या केली सोलापुरातील घटना

poison
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात पेनूर येथे एका आईने आपल्या दोन्ही मुलांना विष पाजून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियांका चवरे असे या मयत महिलेचे नाव आहे. या घटनेत महिलेचे सात महिन्याच्या मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला.आणि चार वर्षाचा मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्या वेळी घडली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील मोहोळ तालुक्यात पेनूर येथे एका महिलेने घरगुती वादातून कंटाळून टोकाचे पाऊल उचलत आपल्या दोन्ही चिमुकल्यांचे विषारी औषध देऊन आपले आयुष्य संपविले आहे.  या घटनेत मुलगी सुप्रिया हिचा मृत्यू झाला असून मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मयत प्रियांकाच्या घरात बऱ्याच दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरु होते. अखेर दररोजच्या वादाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल घेत आपली जीवन यात्रा संपविली. पोलीस घटनेचा तपास करत आहे.